EducationYouth

५ सोप्या गोष्टी जे तुमचे संभाषण प्रभावी करतील

Spread the love

नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? आज आपण संभाषण कौशल्य – Communication Skills बद्दल जाणून घेणार आहोत. तरुणांनो या गोष्टींचा दीर्घकाळ प्रभाव तुमचा सर्वांचा आयुष्यावर राहणार आहे. 

मित्रांनो आपल्यापैकी बरेच असे तरुण मित्र मैत्रिणी आहेत जे कोणतंही संभाषण सुरु करायला घाबरतात. संवाद कुठून सुरु करायचा आणि कुठे संपवायचा या गोंधळात पडण्यापेक्षा आपण गप्पच बसलेलं बरं. मित्रांनो Communication Skills साठी पर्याय नाही. तुम्ही ऑफिस, घरी किंवा कॉलेज मध्ये तुमचा मित्रपरिवार सोबत या सर्व ठिकाणी तुम्ही संभाषण कौशल्याचा उत्तम वापर करू शकता.

१) Smile – जेव्हा तुम्ही नवीन किंवा अनोळखी व्यक्तीला भेटता तेव्हा त्या संभाषणाला एका सामील ने सुरवात करा. मित्रानो असे म्हटले जाते – “Smile is the shortest distance between two people.” Smile सुरवातीची शांतता संपवण्यासाठी आपल्याला चांगली मदत करते. अनोळखी व्यक्तीसोबत संभाषण सुरु करण्यात जी अडचण असते ती फक्त एका Smile ने नाहीशी होते. कारण आपण Smile दिल्यामुले समोरचा व्यक्ती सुद्धा Smile देतो आणि तीच तुमचा संभाषणाची सुरवात असते. आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे तुमची Smile समोरचा व्यक्तीचा Right Brain मध्ये स्टोरे होते आणि तुम्ही त्या व्यक्तीला भविष्यामध्ये कधी पुन्हा भेटलात तर तो व्यक्ती त्या Smile ने पुन्हा कनेक्ट होतो. आजून एक फायदा म्हणजे “Smile is the best way to build rapport.” तुम्हाला एखाद्या सोबत Rapport तयार करायचे असेल तर Smile चा छान उपयोग होतो.  

२) Body Language – संवाद साधताना चांगल्या Body Language, Eye Contact आणि आपल्या आवाजाचा चड उतारावर लक्ष देणे गरजेचे आहे. मैत्रीपूर्ण संवादासह आणि चांगल्या देहबोलीसह आपण इतरांवर संवाद साधताना खूप चांगल्या प्रकारे प्रभाव पाडू शकतो. Body Language संपूर्ण संवादामध्ये ५५% सहभाग असते. Body Language हा संवादाचा न बोललेला जाणारा भाग आहे जो आपण आपल्या खऱ्या भावना प्रकट करण्यासाठी आणि आपला संदेश अधिक प्रभावीपणे समोरचा पर्यंत पोहोचवण्यासाठी वापरतो. 

३) Eye Contact – Communication मध्ये Eye Contact खूप महत्वाचा आहे. तुम्ही संभाषणात लक्ष केंद्रित केले आहे कि नाही? हे त्यातून जाणवते. समोरचा व्यक्तीकडे त्याचा बोलण्याकडे नीट लक्ष देऊन पहा. फक्त एका गोष्टीची काळजी घ्या कि हे करताना समोरचा व्यक्तीला तुम्ही नुसते टक लावून बघत आहात असे वाटणार नाही. असे केल्यामुळे समोरचा व्यक्ती म्हणजे तो किंवा ती अस्वस्थ होऊ शकते. 

४) आत्मविश्वास – एक चांगला संवाद न होण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे आत्मविश्वास. 

आत्मविश्वास आपल्याला स्पष्टतेने बोलण्याची परवानगी देतो. आत्मविश्वासाने संवाद साधणारा व्यक्ती आपल्या जवळील लोकांना स्पष्ट आणि सक्रिय पद्धतीने बोलू शकतात. 

५) संवाद वाढवणारे प्रश्न  – असे प्रश्न पूर्णपणे टाळा ज्याचे उत्तर हो किंवा नाही मध्ये येईल. आजचा दिवस चांगला होता का? या प्रश्नाचे उत्तर साहजिकच हो किंवा नाही मध्ये येईल. या प्रकारचा प्रश्नांमुळे आपले संभाषण जास्त वेळ सुरु राहत नाही. चांगला संवादक होण्यासाठी तुम्हाला असे संभाषण वाढवणारे किंवा त्याला आजून मजेशीर करणारे प्रश्न येणे गरजेचे आहे. 

मित्रांनो वरील दिलेल्या गोष्टींचा तुम्ही संवाद साधताना उपयोग करा. मित्रांनो अशा प्रकारच्या ब्लॉग्ससाठी आणि खास करुन युवकांसाठी, आमच्याकडे अनेक ब्लॉग्स उपलब्ध आहेत. आमच्या  वेबसाइटला फॉलो करा. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा. युवकांसाठी आम्ही Youth Elevate व्हाट्स अँप ग्रुप चालू केला आहे ज्यामध्ये आम्ही वेळेचे प्रभावी व्यवस्थापन, संवाद कौशल्य, सवयी, नेतृत्व कौशल्य तसेच विविध विषयांबद्दल जाणून घेऊन युवकांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा, सेशन, ऍक्टिव्हिटी घेऊन रुजवणार आहोत.. 

धन्यवाद!

– मोहिनीश झिमन


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *