StudentYouth

युवकांनो या ४ व्यत्यांपासून दूर राहा (Distraction)

Spread the love

आपला भारत देश हा एक समृध्द राष्ट्र आहे. आज जगातील इतर सर्व देश भारताकडे स्वतःहून मैत्रीचा हात पुढे करतात. आज इतर प्रत्येक देशाला या महाशक्ती भारत देशासोबत व्यापार किवा इतर कोणत्याही कारणाने संबंध प्रस्थापित करायचे आहेत. याच अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे भारत हे एक युवा राष्ट्र आहे. आपल्या देशात ६५% लोकसंख्या ही फक्त युवकांची आहे. आज भारत देशासमोर हिमालयाएवढी मोठी आव्हाने आहेत. दुसरीकडे युवकांकडे ती आव्हाने सोडवण्याची संधी देखील आहे. पण देशाच्या आव्हानांवर लक्ष देण्याआधी तुम्ही दररोज एका आव्हानाला सामोरे जाता आणि तुम्हाला कळत सुद्धा नाही? 

मित्रांनो तुम्ही एक महत्त्वाचे कार्य करत आहात आणि तेवढ्यात तुम्ही तुमचा शेजारी ठेवलेल्या मोबाईलची मेसेज नोटिफिकेशन टोन वाजते तुम्ही ते ऐकता आणि सवयी प्रमाणे तुम्ही तुमचा मोबाईल मेसेज चेक करायला घेता. मेसेज चेक करत असताना तुम्ही मोबाईल वरील इतर नोटिफिकेशन आणि ऍप्प्स सुद्धा चाळून घेता. या सर्व प्रक्रियेत तुम्ही हाती घेतलेले महत्त्वाचे काम राहते बाजूला. मित्रांनो तुम्ही तर आगदी प्रामाणिकपणे कार्याला सुरुवात केलेली मग एका मेसेज टोनमुळे तुम्हाला काय झालं? तुमचे लक्ष विचलित झाले आणि तुम्हाला कळले सुद्धा नाही. विचार करा जर ह्याचे रुपांतर तुमच्या सवयींमध्ये झालं तर? आयुष किती कठीण होऊन बसेल. 

लक्ष विचलित होणे हे या आधुनिक जीवनातला शाप आहे. कोणत्याही एका कामावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करणे हल्ली कठीण होऊन बसते. आज आपण याच लक्ष विचलित करणाऱ्या अडथळ्यांबद्दल जाणून घेऊया.

मोबाईल नोटीफिकेशन्स – या आधुनिक जगात मोबाईल प्रत्येक माणसाच्या हातातील एक महत्त्वाचे यंत्र बनले आहे. असे म्हटले जाते की यंत्र हा माणसाचा गुलाम आहे. पण मोबाईलच्या बाबतीत थोडे उलट झाले आहे. माणूसच मोबाईलचा गुलाम बनून राहिला आहे. दिवसाचे कित्येक तास आपले डोके त्या मोबाईल स्क्रीन मध्ये टाकून बरेच युवक बसलेले आसतात. एवढे सर्व असून जेव्हा तुम्ही मोबाईल बाजूला ठेऊन एखादे काम करायला घेता तेव्हा मात्र हे सारखे वाजणारे नोटीफिकेशन्स तुम्हाला परत मोबाईल मध्ये खेचून घेऊन येतात. मग वेळ कसा निघून जातो आणि लक्ष केव्हा विचलित होऊन जाते हे आपल्यालाच कळत नाही. आपल्याला याची एवढी विचित्र सवय होते की कधी कधी मोबाइल वाजत सुद्धा नाही पण आपल्याला मोबाईल रिंग झाल्याचा भास होतो. आपण सारखा मोबाईल तपासून पाहतो. कधी मोबाईल बराच वेळ रिंग झाला नाही तर आपण अस्वस्थ झाल्यासारखे होतो. या विचित्र सवयीतून बाहेर निघणे गरजेचे आहे. पण मग यावर उपाय काय? मोबाईल सेटिंग्स मध्ये जाऊन – नोटीफिकेशन्स ऑप्शन वर क्लिक करुन आपण सोशल मिडिया – फेसबुक, व्हॉट्स ऍप, इन्स्टाग्राम, ईमेलस या सारख्या व इतर तुमचे लक्ष विचलित करणाऱ्या ऍप्प्स चे नोटीफिकेशन्स तसेच मोबाइल मधले न्यूज़ फिड्स बंद करणे गरजेचे आहे. 

वायफळ संभाषणे – मित्रांनो तुम्ही ट्रेन किंवा बसने प्रवास करताना बघितले असेल. दोन व्यक्ती एखाद्या वायफळ विषयावर बोलत आसतात आणि ते ऐकून तिसरा व्यक्ती ते सर्व ऐकून त्या विषयाचे ज्ञान नसताना त्या संभाषणामध्ये एवढा उत्साहाने भाग घेतो जणू काही त्या संभाषणाला त्यानेच सुरुवात केली आहे. अशा  संभाषणाच्या शेवटला आपल्याला कळून येते की या चर्चेतून काहीच निष्पन्न झाले नाही. ना समोरच्या व्यक्तीच्या जीवनात काही फरक पडला, ना माझ्या जीवनात त्या बोलण्याचा काही उपयोग झाला. वाया गेला तो फक्त वेळ, जो पुन्हा परत येऊ शकत नाही. कित्येक युवकांना मी बघितले आहे त्यांचे मित्र एका टीव्ही शो बद्दल बोलतात आणि त्या संभाषणामध्ये याला काहीच बोलता येत नाही म्हणून हा खास तो टीव्ही शो बघण्यामध्ये बहुमूल्य वेळ घालवतो. ज्याने त्याचा बुध्दीत काहीच चांगली भर पडत नाही. उलट नकोत्या गोष्टींवर विचार करण्यात त्याचा मेंदू सर्व ऊर्जा खर्चून बसतो. मित्रांनो अशा वायफळ संभाषणापासून दूर रहा.   

सोशल मीडियाचा अतिरेक – सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे माणसांना जोडण्यासाठी. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स ऍप, स्नॅपचॅट यांसारख्या अनेक माध्यमांच्या नवीन गोष्टी शिकण्यासाठी, टेक्नोलॉजी जाणून घेण्यासाठी, परदेशातील नवीन उपक्रम जाणून घेण्यासाठी, तसेच आपण नवीन काय शोध लावले आहेत ते जगभर प्रसिद्ध करण्यासाठी आणि संभाषणाची नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी केला जाऊ शकतो. काही माणस तसे करतात सुद्धा. पण युवकांमध्ये ह्या माध्यमांचा उपयोग म्हणजे मनोरंजनाचे आजून एक साधन म्हणून केला जातो. दिवसभर त्यावर सोशल मीडियावर ऑनलाइन राहून मित्रांसोबत चॅटिंग करून यातून काय निष्पन्न होणार आहे? हल्ली तर असे झाले आहे की एकाच घरात राहणारे कुटुंब एकमेकांशी व्हॉट्स ऍप वर फैमिली ग्रुप बनवून एकमेकांशी संवाद साधतात. काही युवक तर सोशल मीडिया वरती वापरणाऱ्या भाषेचा उपयोग दैनंदिन जीवनात सुद्धा करतात. मी तर हे सुध्दा बघितले आहे की एखादा व्यक्ती हॉस्पिटल मध्ये एडमिट झाला की स्वतःचा पहिला अपडेट सोशल मीडियाच्या स्टेटस वर ठेवतो या भावनेने की सर्वांना ते कळावे आणि त्याला सहानुभूती मिळावी. मित्रांनो तुम्ही स्वतः या जाळ्यात अडकत चालले आहात. वेळीच स्वतःला सावरा. ऍप यूसेज लिमिट चा वापर करा आणि स्वतःला या अडथळ्या पासून दूर ठेवा.

अतिविचार – मित्रांनो तुम्ही एकाच विचारावर किंवा परिस्थितीवर वारंवार विचार करता तेव्हा ती तुमच्या जीवनात व्यत्यय आणते. अतिविचार सहसा दोन प्रकारांमध्ये मोडतो – भूतकाळाबद्दल अफवा आणि भविष्याबद्दल चिंता करणे. मित्रांनो आपल्याला एखादे कार्य करायला संगीतले की या सवयीमुळे त्या  कार्याच्या नियोजनात एवढे बुडून जातो की आपण प्रत्यक्ष  करणाऱ्या क्रियेवर लक्षच देत नाही.  अतिविचारामुळे इतर कशावरही लक्ष देणे कठीण होऊन बसते. अतिविचारामुळे आपण सर्वात वाईट परिस्थितीचा वरंवार विचार करतो. एखाद्या कृतीचा परिणामांबद्दल नकारात्मक विचार करण्यात बराच वेळ घालवणे. कित्येकदा आपण आपल्या समोर किंवा भविष्यात येणाऱ्या नवीन संधीकडे दुर्लक्ष करतो किंवा शंका घेतो. मित्रांनो अतिविचार हे  तुमच्यातील कृतिशील माणसाला कृती करू देत नाहीत. म्हणून एखाद्या कार्यावर कृती करून बघा हे तुम्हाला तुमच्या डोक्यातून विचारांना बाहेर काढेल आणि कृती करण्यायोग्य पावले उचलण्यासाठी तुमच्या ऊर्जेचा योग्य वापर होईल.

मित्रांनो वरील दिलेल्या तुमचा  आयुष्यातील  व्यत्यांना ओळखा आणि वेळीच सावध व्हा. मित्रांनो अशा प्रकारच्या ब्लॉग्ससाठी आणि खास करुन युवकांसाठी, आमच्याकडे अनेक ब्लॉग्स उपलब्ध आहेत. आमच्या  वेबसाइटला फॉलो करा. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा. युवकांसाठी आम्ही Youth Elevate व्हाट्स अँप ग्रुप चालू केला आहे ज्यामध्ये आम्ही वेळेचे प्रभावी व्यवस्थापन, संवाद कौशल्य, सवयी, नेतृत्व कौशल्य तसेच विविध विषयांबद्दल जाणून घेऊन युवकांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा, सेशन, ऍक्टिव्हिटी घेऊन रुजवणार आहोत.. 

धन्यवाद!

– मोहिनीश झिमन


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *