EducationStudentYouth

दैनंदिन वेळापत्रक तयार करताना तरुणांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात

Spread the love

“जेव्हा तुमच्याकडे स्वतःचेवेळापत्रक नसते तेव्हा आपल्याला इतरांनी दिलेल्या वेळापत्रकाचे पालन करावे लागते.

मला खात्री आहे आपण सर्वानी ही गोष्ट  अनुभवली असेलच. आपण दररोज रात्री एक अलार्म सेट करुन झोपतो. हा अलार्म सकाळी वेळेत उठण्यासाठी सेट केलेला असतो. सकाळ होते तेव्हा तुम्ही लावून ठेवलेला तो अलार्म अगदी वेळेत वाजतो. आता हे झाल्या नंतर पढुील दोन पैकी एक गोष्ट तुम्ही करता. एक म्हणजे तो अलार्म वाजल्या वाजल्या तुम्ही उठून तो अलार्म बंद करता आणि  तुम्ही ठरवलेल्या दिनचर्येला उत्साहाने सुरुवात करता. मग ते  सुदृढ शरीरासाठी असणारे व्यायाम, योगासने करण्यासाठी किंवा एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी लवकर उठून केलेली तयारी असो दिनक्रम एकदम ठरलेला. आता पाहूया दुसरा प्रकार इथे सुद्धा सकाळी अलार्म अगदी वेळेत वाजतो पण इथे मात्र  तुमच्याकडून अलार्मला  स्नझू केलं जातं आणि झोपनू पडून राहण्याकडे जास्त लक्ष दिले जाते. 

मित्रांनो कधी विचार केलाय  तुम्ही अलार्म स्नझू का करता? कारण  तुम्हाला माहितच नाही तुम्ही दिवसाची सुरुवात कोणत्या गोष्टीपासनू करणार आहात आणि कोणत्या वेळेत काय करणार आहात. आई पहाटे जबरदस्ती उठवते म्हणनू आपण उठतो आणि बाबा आपल्याला नेहमी सांगत असतात की लवकर उठून पहाटेचा अभ्यास केलेला डोक्यात एकदम घट्ट बसनू राहतो म्हणनू आपण अभ्यास करायला घेतो. झालंना, तुम्ही स्वतःचेवेळापत्रक नाही बनवूशकलात म्हणनू आई – बाबा यांनी तुमचे वेळापत्रक तुम्हाला न विचारताच तयार केला. जर तुम्हाला तुमचे दैनंदिन वेळापत्रक तयार करता आले तर? कठीण वाटतंय? मित्रांनो यात कठीण अवघड असेकाहीच नाही. आज आपण हे दैनंदिन वेळापत्रक कसे तयार करतात आणि तुमच्यासारख्या  तरुणांनी त्या वेळापत्रकात कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा हे आपण बघणार आहोत.

To Do List तयार करणे-

मित्रांनो To Do List हे खपू महत्वाचे साधन आहे. आज दिवसभरात जेकाही कार्य करायचे आहेत त्यांना प्राधान्या क्रमानुसार लिहून काढणे आणि दिवसाला उत्साहात सुरुवात करणे. प्रत्येक तासाला To Do List चा आढावा घेत रहा. To Do List मधल्या किती गोष्टी पर्णू केल्या आहेत आणि किती

गोष्टी आजनू करायच्या बाकी आहेत हे तुम्हाला समजेल. 

तुमचे दैनंदिन वेळापत्रकाची PDF कॉपी मिळवण्यासाठी इथेक्लिक करा

आताच वाचा – युवा विद्यार्थ्यांसाठी वेळेचे प्रभावी व्यवस्थापन 

अवघड कार्याला प्राधान्य द्या –

मित्रांनो आपण अवघड गोष्ट करायची झाली की आपण ती शक्यतो किती उशिरा करता येईल यावर आपण लक्ष देतो आणि ती करतच नाही. तसेच एखादेकठीण कार्य किवां अवघड वाटणारा विषय याकडेआपण असेच दर्लुक्षर्ल करतो. जो विषय तुम्हाला अवघड वाटतो त्यावर अधिक लक्ष आणि वेळ देणे गरजेचे आहे. त्या  विषयांच्या सरावाला आणि वाचनाला वेळापत्रकात प्राधान्य द्या. वेळापत्रक लवचिक असणे गरजेचे  आहे. 

मित्रांनो गरजेचंनाही वेळापत्रकातील पूर्ण वेळ ही कार्यांनीच भरायला हवी. काही जागा किंवा वेळ रिकामी राहत असेल तरी चालेल कारण बदल आणि अनपेक्षित घटनांना सामावनू घेण्यासाठी तमचे वेळापत्रक लवचिक असावे. तमुच्या वेळापत्रकात लवचिकतेसाठी काही जागा द्या. एखादेकार्य पुढे सरकते किंवा वेळ लागतो तर ह्या गोष्टींचा समावेश आपण सहज कोणताही ताण न घेता करू शकतो.

कौशल्य विकासावर भर द्या –

मित्रांनो तुम्ही करत असलेल्या शैक्षणिक प्रगती सोबत सर्वांगीण विकास होणे फार गरजेचे आहे. खेळ, संगीत तसेच इतर कौशल्यांमध्ये सुध्दा तुम्ही पारंगत होणे फार गरजेचे आहे. कौशल्य विकास ही आजच्या तरुणांची गरज बनली आहे. तुमच्यातील गुण ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन देणाऱ्या मार्गदर्शकांसोबत  तुमची चर्चा  होणे फार गरजेचे आहे. त्यामुळे कृपया या सर्व उपक्रमांचा तुमच्या वेळापत्रकात समावेश करा. यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य देखील सुधारते.

वेळापत्रकाचे पालन करा – 

मित्रांनो मला सांगा एखाद्या कौशल्यामध्ये तुम्ही खपू पारंगत आहात पण तुम्ही त्याचा कधीच वापर केला नाही तर ते तुमच्यासाठी किती प्रभावी ठरू शकते हे समजेल का? मुळीच नाही. तसेच एखादे वेळापत्रक तेव्हाच  प्रभावी ठरते जेव्हा तुम्ही त्याचा काटेकोरपणे पालन करता आणि त्याची सवय लाऊन घेता. तुमच्या वेळापत्रकाचा नियमितपणे आढावा घ्या आणि तुमच्या  शैक्षणिक व वयैक्तिक धेय्यायावर काम करण्यासाठी जरूर खात्री करा. या आहेत काही विशषे गोष्टी ज्यांचा तरुणांनी प्रभावी वेळापत्रक बनवताना नक्कीच विचार करावा. मित्रांनो अशा प्रकारच्या ब्लॉग्ससाठी खास करुन युवकांच्या विषयी ब्लॉग्ससाठी आमच्या वेबसाइटला फॉलो करा. खालील दिलेल्या लिकं वर क्लिक करुन आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा. युवकांसाठी आम्ही YEP हा व्हाट्स अपँ ग्रुप चालू केला आहे ज्यामध्ये आम्ही विविध विषयांवर चर्चा, सेशन, ऍक्टिव्हिटी घेतो.

धन्यवाद.

– मोहिनीशी झिमण


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *