EducationStudentYouth

युवा विद्यार्थ्यांसाठी वेळेचे प्रभावी व्यवस्थापन 

Spread the love

वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन कसे करावे हे शिकणे हे युवकांसाठी एक महत्त्वाचे कौशल्य आहे. 

असे असूनही बरेच युवा विद्यार्थी हे कौशल्य शिकण्यात अयशस्वी ठरतात म्हणूनच अपूर्ण गृहपाठ , विस्खळीत दिनक्रम या गोष्टींना सामोरे जावे लागते. मला अभ्यास करायला वेळच पुरत नाही किवा आजून ५ मिनिटे अधिक मिळाली आसती ना तर मी तो ४ मार्कस चे उत्तर पूर्ण लिहिले असते. या अशा एक ना अनेक तक्रारी आपण वेळेच्या बाबतीत करत असतो ज्यामुळे युवा विद्यार्थ्यांना ताण आणि निराशा सारख्या समस्या सतावतात. 

मला सांगा खरच आपल्याकडे वेळ कमी आहे का? या जगात एकच गोष्ट सर्वांना दररोज समान मिळते आणि ती म्हणजे वेळ. एका साधारण विद्यार्थ्याला कमी वेळ आणि एका हुशार व स्मार्ट विद्यार्थ्याला जास्त वेळ असे कधी होते का? कधीच नाही. दररोजचे २४ तास सर्वांना मिळतात पण त्याचा वापर कसा आणि कुठे करायचा हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचे असते. मित्रांनो विचार करा जर तुम्हाला वेळेचे प्रभावीपणे व्यवस्थापन करता आले तर? खरंच कितीतरी गोष्टी सरळ आणि सोप्या होऊन जातील. 

वेळेचे व्यवस्थापन कौशल्य हे युवा विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि त्याच सोबत इतर दैनंदिन आवश्यक कामात समतोल राखण्यासाठी मदत करते.  स्मार्ट विद्यार्थी स्वतःला वेळेचे व्यवस्थापन कौशल्यासोबत सुसंगत करून घेतात. आता जर तुम्ही विचार करत असाल की हे अवघड काम ते कसे करत असतील बरं? तर याचा ४ सोप्या आणि प्रभावी पायऱ्या आपण आता बघूया. या प्रभावी पायऱ्यांचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग होण्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत  नक्की वाचा. 

दैनंदिन वेळापत्रक तयार करा – 

जेव्हा आपल्याकडे स्वतःचे वेळापत्रक नसते तेव्हा आपल्याला दुसऱ्याच्या वेळापत्रकाचे पालन करावे लागते. मित्रांनो कधी तुम्ही संध्याकाळी घरी बसला आहात. थोड्या वेळात तुम्ही तुमचा अभ्यास करायला घेणार होता आणि तेवढ्यात तुमचा जीवलग मित्र तुमच्या घर बाहेर येऊन तुम्हाला काय करतोयस असे विचारतो आणि तुम्ही त्यावर अगदी सहज  ‘काहीच नाही’ म्हणून उत्तर देता तेव्हा तो मित्र तुम्हाला सोबत बाहेर घेऊन जे जातो तो सरळ २ ते ३ तासांनीच तुम्हाला घरी परत घेऊन येतो. घरी परतल्यावर तुम्हाला आठवण होते ते अभ्यासाची आणि आता तर दिलेला अभ्यास करण्या एवढा वेळ सुद्धा नसतो तुमचाकडे याचा परिणाम अपूर्ण अभ्यास. शाळेत किवा कॉलेज मध्ये माझे उद्या काय होणार? मला शिक्षा तर होणार नाही ना? पालकांना शाळेत बोलावले तर? ह्या गोष्टींचा ताण आपण घेण्यास सुरवात करतो. ह्यावर उपाय काय? स्वतःचे वेळापत्रक. तुम्ही वेळापत्रकानुसार आणि वरील सांगितल्या  प्रमाणे कोणत्या गोष्टीसाठी किती वेळ देणार आहात हे सुनिश्चित करणे आणि त्याचे पालन करणे गरजेचे आहे. 

तुमचा दैनंदिन वेळापत्रकाची PDF कॉपी मिळवण्यासाठी इथे क्लिक करा 

अडथळे दूर करा – 

मित्रांनो आपल्या वेळेच्या व्यवस्थापनामध्ये काही अडथळे असतात जे आपल्याला स्पष्ट दिसत किंवा जाणवत नाहीत पण ते असतात मात्र नक्की. अशा अडथळ्यांना ओळखून त्यांना दूर करुन आपण पुढे जाणे गरजेचे आहे. आता हे अडथळे कोण? मोबाईल, टीव्ही, वायफळ गप्प, सवयी, दिशाहीन मित्र. हे आहेत तुमच्या मार्गातील अडथळे. जर आपण नीट विचार केला आणि स्वतःच्या दिनक्रमाचा विचार केला तर एका युवा विद्यार्थ्याचा बहुतांश वेळ ह्या अडथळ्यांमुळे वाया जातो आणि याची साधी जाणीव सुध्दा आपल्याला होत नाही. मोबाईल चा वापर काही सुनिश्चित मिनिटांसाठी आणि अभ्यासा पुरताच झालेला बरा. मोबाईल तुम्हाला अकार्याक्षम होण्यास आणि तुम्हाला इतर विषयांमध्ये नोटीफिकेशन्स द्वारा विचलित करण्यास भाग पाडते. टीव्ही आपल्या ५ मिनिटांचा – १ तास कधी करुन टाकतो हे भल्या भल्या माणसांना सुद्धा समजत नाही. कित्येक युवा मित्र तासांतस टीव्ही समोर बसलेले आणि गरज नसलेले टीव्ही शो बघून माहिती आपल्या मेंदूत साठवत असतात ज्याचा वापर वायफळ गप्पा मारण्या ऐवजी कुठेच होते नाही. टीव्हीचा वापर दिवसातून अर्धा तास विरंगुळ्यासाठी पुरेसा आहे. सर्वात जास्त वेळ जर तुमचा कोणी वाया घालवू शकतात तर ते तुमचे दिशाहीन मित्र. तुम्ही अभ्यास आणि कार्यक्षम गोष्टी सोडून इतर कोणत्या गोष्टींमध्ये तुम्ही व्यस्त राहून तुमचा जास्तीत जास्त वेळ वाया जाईल याची पूर्ण काळजी ते घेतात. मित्रांनो म्हणून ह्या अडथळ्यांपासून दूर रहा.

चालढकलपणा करू नका – 

मित्रांनो दिवसभरात काही महत्त्वाचे आणि थोडे किचकट वाटणारे कार्य आपण ते पूर्ण करण्यासाठी आपल्या वेळापत्रकात लिहिले असते. उदाहरणार्थ – कठीण वाटणाऱ्या विषयाचा अभ्यास, अचानक दिलेले असाईनमेंटस् आणि इतर कामे. यासाठी लागणारा उत्साह विद्यार्थ्यांमध्ये कधी नसतोच. मग सुरू होतो चालढकलपणा. आता लगेच नाही थोड्या वेळाने करू. एवढी काय घाई आहे? निवांत करू. हे नंतर करू. ह्या ना त्या कारणाने आपण ते कार्य करण्यास चालढकलपणा करतो. हे सर्व करुन ते कार्य किंवा तो अभ्यास आपल्यासाठी  सोप होत का? नाही. उलट आपण वेळ घालवून आजून कठीण करून बसतो. या सर्व घटनेमुळे आपण एक गोष्ट मात्र आपल्या मेंदूत पक्की करुन घेतो, ती म्हणजे आपल्याकडे कमी वेळ आहे आणि कमी वेळेत हे कार्य करणे अवघड आणि अशक्य आहे. यावर उपाय काय? तर आपण जी काही कार्य किवा अभ्यास करणार आहोत ते व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी तुम्हाला  लागणाऱ्या  साधनांसमवेत ते पूर्ण करा.

एका वेळी एकाच गोष्टीवर काम करा –

मित्रांनो तुमच्यापैकी बरेच युवा विद्यार्थी मित्र आहेत ज्यांना असे वाटत असेल की एकाच वेळी अनेक गोष्टींवर लक्ष केंद्रित केले म्हणजेच मल्टिटास्किंग केले की आपली वेळेची बचत होतो. पण तसं नाही. मल्टिटास्किंग केल्याने आपण करत असलेल्या कार्याची गुणवत्ता गमावून बसतो म्हणजेच आपण आपले १००% लक्ष त्या कार्यावर केंद्रित करू शकत नाही. म्हणजेच तुम्ही कधी एक चुरशीची मैच किंवा खेळ खेळताना त्यामधे अभ्यासाचा विचार केला आहे का? नाही ना. कारण तुम्हाला तो खेळ तुमचे १००% प्रयत्न देऊन जिंकायचाच असतो. मग आपण अशा प्रकारचेच लक्ष अभ्यास किंवा इतर गुणविकास वर्गाच्या वेळी, कार्यावेळी  का देऊ शकत नाही? तुम्ही बघितले सुद्धा असेल, तुमचे काही मित्र अभ्यास करताना टीव्ही बघत असतात, मधेच बाहेर जाऊन फेरफटका मारुन येतात, गुणविकास वर्गाच्यावेळी  ते इतर बाहेरील गोष्टींवर जास्त चर्चा करतात अशी त्यांची कार्याची पद्धत आणि अशीच पद्धत कदाचीत तुमची सुद्धा असेल. मित्रांनो एका कार्यावर लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला ते अधिक कार्यक्षमतेने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्यात मदत होईल.

या आहेत प्राथमिक स्वरूपातील काही प्रभावी पायऱ्या ज्या युवा विद्यार्थ्यांना वेळेचे प्रभावी व्यवस्थापन करण्यास प्रचंड मदत करतील. पण हे प्राथमिक होते अजून जर या  विषयाचे ज्ञान  तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर

मित्रांनो अशा प्रकारच्या ब्लॉग्ससाठी खास करुन  युवकांच्या विषयी ब्लॉग्स साठी आमच्या वेबसाइटला फॉलो करा. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आमचा व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा. युवकांसाठी आम्ही VYEP हा व्हाट्स अँप ग्रुप चालू केला आहे ज्यामध्ये आम्ही विविध विषयांवर चर्चा, सेशन, ऍक्टिव्हिटी घेतो.

–  मोहिनीशी झिमण


Spread the love

One thought on “युवा विद्यार्थ्यांसाठी वेळेचे प्रभावी व्यवस्थापन 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *