StudentYouth

सकाळच्या दिनचर्येची शक्ती: दिवसाची सुरुवात कशी करावी?

Spread the love

तुम्ही सकाळी उठून पहिली गोष्ट काय करता? अलार्मचे स्नूज बटण दाबायचे? मोबाइल हातात घेऊन नोटिफिकेशन्स चेक करता? फेसबुक स्क्रोल करता? व्हॉट्स अँप तपासता, इंस्टाग्राम स्टोरीज उपडते करता?

तुम्ही सकाळी जे काही करता ते खूप महत्त्वाचे असते. याला तुम्ही मॉर्निंग रुटीन, सवय, किंवा दिनचर्या म्हणा ती योग्यरित्या वापरल्याने तसेच सातत्यपूर्ण सराव केल्याने या कृतींचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम होऊ शकतो.

वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की सकाळची उत्साही दिनचर्या आपल्याला आनंद वाढवण्याची, आत्मविश्वास वाढवण्याची आणि एकूण कामगिरी सुधारण्याची क्षमता देते. दिवसाची सुरवात अधिक कार्यक्षमतेने आणि सुरळीतपणे करण्यासाठी सकाळची दिनचर्या हे एक अतिशय प्रभावी साधन ठरू शकते. कसे काय ते या ब्लॉग मध्ये जाणून घेऊया. 

कारण शोधा – आपल्यापैकी कितीतरी मित्र असे आहेत ज्यांना सकाळी लवकर उठण्याची आणि विशिष्ट दिनचर्येची सवय करून घ्यायची आहे. पण कित्येक प्रयत्न केले तरी त्यांना ते जमतच नाही. याचे कारण काय? याचा जेव्हा शोध घेतला तेव्हा असे आढळून आले की सकाळी लवकर उठण्यासाठी त्यांच्याकडे काही खास कारणच नाही? त्यामुळे तुमचे ध्येय निश्चित करा. तुमच्या आयुष्यातील काही पैलू तुम्हाला सुधारायचे आहेत. वजन कमी करणे, अधिक उत्पादनक्षम असणे, तंदुरुस्त व्हायचे आहे किंवा तुम्हाला तुमची वाटचाल जगातल्या ५ % यशस्वी लोकांचा दिशेने करायची असेल तर सकाळच्या विशिष्ट सवयी तुम्हाला तुमच्या या दीर्घकालीन उद्दिष्टांशी जोडणे आवश्यक आहे. फक्त एक करा की हे कारण तुम्हाला सकाळी अंथरुणातून बाहेर येण्यास प्रवृत्त करेल. 

उर्वरित दिवसासाठी स्वतःला तयार करा – दैनंदिन सकाळची दिनचर्या करणे म्हणजे दिवसभरासाठी तुमच्या कामाच्या यादीत (To Do List) आणखी कामांची भर घालणे असे नाही. तर तुमची सकाळ पूर्ण उत्साहाने भरून काढण्याबद्दल आहे, जी तुम्हाला येणाऱ्या संपूर्ण दिवसभरासाठी टवटवीत ठेवण्यात आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. सकाळची दिनचर्या तुमचा दिवसाची सुरुवात उत्तम करते. तुम्ही जागे झाल्यापासून तुमचा प्रत्येक क्षण मौल्यवान आणि उत्पादक गोष्टींवर घालावा. 

सकाळची दिनचर्या – मित्रांनो प्रत्येकजण आपले सकाळचे दिनचार्य स्वतःचा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींचा प्रयोग करू शकता. सरतेशेवटी, हे सर्व हेतुपुरस्सर वयक्तिक उद्दिष्ट ठरवणे आणि दररोज सकाळी लहान पावले उचलणे ज्यामुळे कालांतराने अधिक पटीने परिणाम दिसून येईल. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींसह प्रयोग करू शकता आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे ते पाहू शकता. सकाळच्या विविध सवयी वापरून पहा, थोडा धीर धरा आणि ते तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहेत का ते पहा. 

वैयक्तिकरित्या सकाळच्या सवयीची लिस्ट तयार करून दिलेली आहे ते पहा – 

10 मिनिटे ध्यान : ताणतणाव कमी करण्यासाठी आणि दिवसाची सुरुवात मन:शांतीने करण्यासाठी हे आवश्यक करा. 

15 मिनिटे व्यायाम : तंदुरुस्त राहण्यासाठी आणि तुमचा शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जेने भरण्यासाठी व्यायाम करा. मग त्याची सुरवात १० सूर्यनमस्कार, उड्या मारणे किंवा मॉर्निंग वॉक यांचा पासून झाली तरी उत्तम.  

थंड शॉवर: तुमचे शरीर आणि मन पूर्णपणे सक्रिय करण्यासाठी आणि दीर्घकालीन आरोग्याचे फायदे घेण्यासाठी थंड पाण्याने शॉवर घ्या.  

विचार कागदावर उतरावा : विचार उलगडण्याचा आणि त्यांना कागदावर उतरावल्याने तुमचे ध्येय अधिक स्पष्ट होते. तुमचा मेंदू त्यातील गोंधळ साफ करून महत्वाचा गोष्टींसाठी जागा मोकळी करतो. जेव्हा तुम्ही तुमचे हेतू लिहून ठेवता, तेव्हा तुमच्यासाठी काय महत्त्वाचे आहे याची तुम्हाला अधिक जाणीव होते. 

10 मिनिटे वाचन : दिवसाची सुरुवात वाचनाने आणि शिकण्याने केल्याने तुमच्या जीवनातील विविध पैलूंकडे एक नवीन दृष्टीकोन आणण्यात मदत होऊ शकते. दररोज शिकण्यासाठी दहा मिनिटे गुंतवल्याने तुमची वैयक्तिक वाढ सुधारण्यास मदत होईल.

मित्रांनो सकाळच्या दिनचर्येची शक्ती ही अशी गोष्ट आहे ज्याला कमी लेखले जाऊ शकत नाही कारण हे  तुमच्या जीवनात नियंत्रणाची भावना निर्माण करेल, तुम्हाला दिवसभर उत्साही, एकाग्र आणि तुम्हाला चांगले कार्य करण्यास मदत करेल!

तर, प्रश्न असा आहे: तुम्ही तुमचा दिवसाची सुरुवात कसे करताय?

मित्रांनो वरील सुचवलेल्या गोष्टींवर नक्की कृती करा. तुम्हाला काही अडथळे आले किंवा ते कुठून सुरु करावं यात गोंधळले असाल तर मला वयक्तिक व्हाट्स अँप वर मेसेज करा. मला या गोष्टी तुमचा सोबत एकत्र करायला नक्की आवडेल. तसेच खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आपल्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा. युवकांसाठी आम्ही Youth Elevate व्हाट्स अँप ग्रुप सुरु केला आहे ज्यामध्ये या सवयी तुमचामध्ये रुजवण्यात तुम्हाला मदत करू. तसेच वेळेचे प्रभावी व्यवस्थापन, संवाद कौशल्य, नेतृत्व कौशल्य तसेच विविध विषयांबद्दल जाणून घेऊन युवकांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा, सेशन, ऍक्टिव्हिटी घेऊन रुजवणार आहोत.. 

धन्यवाद!

– मोहिनीश झिमन


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *