StudentYouth

३ सवयी ज्या प्रत्येक तरुणाने स्वतःमध्ये रुजवाव्या

Spread the love

आपण आधी सवयी घडवतो आणि मग ह्या सवयी आपल्याला घडवतात. 

सवयी म्हणजे नक्की काय? सवयी म्हणजे तुम्ही घेतलेले छोटे निर्णय आणि तुम्ही दररोज करत असलेल्या कृती. दररोजच्या आपल्या वर्तणूकीत 40 टक्के सवयी असतात. आज तुम्ही आनंदीत आहात किंवा तुम्ही किती दुःखी आहात हे  तुमच्या सवयींचेच परिणाम. तुम्ही तंदुरुस्त आहात किंवा सारखे आजारी पडत आहात हे  तुमच्या सवयींचेच परिणाम.  एवढेच काय आज तुम्ही यशस्वी आहात किंवा अयशस्वी होत आहात हे सुद्धा तुमच्याच  सवयींचे परिणाम. म्हणजेच काय? तर ज्या गोष्टी तुम्ही  वारंवार करता त्याच गोष्टीने तुमचे व्यक्तिमत्त्व घडत गेले आहे. मित्रांनो आज  तुमच्या सोबत सुद्धा हेच घडले आहे. तुम्ही आज जे आहात जसे आहात ते तुमच्या सवयींचेच प्रतिबिंब आहे. 

तुमच्यापैकी  कितीतरी तरुण असे असतील ज्यांना आपल्या आयुष्यात चांगल्या सवयी लावायच्या असतात. परंतु असे करणे त्यांना खूप अवघड वाटते. आपल्याला चांगल्या सवयी लावण्यापासून काय रोखते? 

  • लहानपणापासून लागलेल्या वाईट सवयी ज्यामुळे नवीन सवयी तयार करणे अत्यंत कठीण बनते.
  • स्वयं शिस्तीमुळे चांगल्या सवयी कायम ठेवण्याचा अभाव.
  • बऱ्याच गोष्टींमध्ये लक्ष असल्यामुळे विशेषकरून सवयींवर लक्ष  द्यायला वेळ मिळत नाही.

चांगल्या सवयींचे महत्त्व आणि त्या लागू केल्याने तरुणांच्या जीवनात कसा फरक पडू शकतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. खालील दिलेल्या ३ सवयी एक तरुण म्हणून तुमचा जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतील म्हणून हा ब्लॉग शेवटपर्यंत  नक्की वाचा.

वाचनाची सवय – वाचन सवयीचा अभाव सध्या तरुणांमध्ये दिसून येतो. वाचन म्हटले की कंटाळा. कोण एवढ वाचत बसेल? आधीच अभ्यास करतो ते काय कामी आहे का? त्यात हे आजून पुस्तक वाचन. मित्रांनो वाचन ही एक उत्तम सवय आहे. तुमची स्मरणशक्ती त्याने सुधारू शकते. ही सवय लावणे खूप सोपे आहे. दिवसातून फक्त १५ मिनिटे तुम्हाला आवडणारी आणि वाचत राहण्याची इच्छा असलेली पुस्तके वाचून ही सवय विकसित करता येते. जर तुम्हाला शक्य असेल तर, दररोजची वाचनाची वेळ कायम पक्की करून घ्या ही तुमची वाचनाची सवय विकसित करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. 

सातत्य – तुम्ही बघितले सुद्धा असेल तुमचे काही मित्र किंवा तुम्ही सुद्धा व्यायाम करण्यासाठी जिमला जाण्यास सुरुवात करता. सुरुवातीचे काही आठवडे आपण उत्साहाने जातो आणि नंतर हा उत्साह कमी कमी होऊ लागतो. पुढे जाऊन एक दिवस असा येतो जिथे आपण जिमला जाण्यास बंद करतो. यात कमी काय पडते तर ते आपले सातत्य. मित्रांनो सातत्य ही सवय सर्व कार्यांमध्ये उपयोगी येते. सातत्य या शक्तीला कमी लेखू नका. आज कदाचित तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फायदे दिसत नाहीत किंवा तुम्ही निराश होत असाल तर अजिबात निराश होऊ नका कारण सातत्यात ठेवणे म्हणजे सरासरीचे रुपांतर उत्कृष्टतेमध्ये होणे.

आर्थिक व्यवस्थापनाची सवय – मित्रांनो ही सवय तुम्ही तुमचे पैसे कसे खर्च करता आणि वाचवता यावर केंद्रित आहे. तुमच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा दररोज मागोवा घ्या. तुम्ही दररोज किती पैसे खर्च करत आहात तसेच किती पैशांची बचत करत आहात हे तुम्हाला माहीत असणे आणि त्यांची नोंद तुमचाकडे असणे गरजेचे आहे. आर्थिक सवयी या तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील. आपण बघतो की बरेच तरुण आजकाल स्वतःच्या गरजेपेक्षा भौतिक इच्छेला बळी पडत आहेत. एकाद्याकडे ती वस्तू आहे म्हणून माझ्याकडे सुद्धा ती असायलाच हवी या भावनेतून गरज नसताना आपण खर्च करुन बसतो. त्यापेक्षा हाच खर्च जर तुम्ही तुमचे कौशल्य विकसित करण्यात गुंतवणूक कराल तर तुम्ही तुमचे उज्ज्वल भविष्य सुरक्षित कराल.

या आहेत ३ सवयी ज्या प्रत्येक तरुणाने स्वतःमधे रुजवण्याचा प्रयत्न करावा कारण या सवयी तुम्हाला भविष्यात प्रचंड मदत करतील. मनात आलेल्या विचाराला  आचरणात घेऊन येणे सुद्धा महत्त्वाचे आहे म्हणजेच  ॲक्शन ऑन युअर थॉट्स. मित्रांनो अशा प्रकारच्या ब्लॉग्स साठी खास करुन तरुण मित्रांना मार्गदर्शन करणाऱ्या  ब्लॉग्ससाठी आमच्या वेबसाइटला फॉलो करा. खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन आमच्या व्हॉट्स ऍप ग्रुपला जॉइन व्हा. युवकांसाठी आम्ही व्हाट्स अँप ग्रुप YEP Batch 3 चालू केला आहे ज्यामध्ये आम्ही विविध विषयांवर चर्चा, सेशन, ऍक्टिव्हिटी घेतो.


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *